उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  वर्षातील विशेष दिनानिमित्त नियमितपणे रक्तदान शिबिरांचे आयोजन करून शासकीय रक्तपेढीला वेळोवेळी रक्त संकलनात सहकार्य करणार्‍या प्रसेना प्रतिष्ठाणचा जिल्हा रूग्णालयाच्यावतीने जागतिक रक्तदाता दिनानिमित्त गौरव करण्यात आला.

 यावेळी मान्यवरांच्या हस्ते रक्त विलगीकरणाच्या कार्यामध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानीत डॉ. कार्ल लॅन्डस्टिनर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रसेना प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संदीप बनसोडे यांनी संस्थेच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते गौरव स्वीकारला. प्रसेना प्रतिष्ठाण मागील 13 वर्षांपासून उस्मानाबाद शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करते. तसेच रक्ताचा तुटवडा असल्यासही संस्थेच्यावतीने सदस्य शासकीय रक्तपेढील येवून रक्तदान करतात.

यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अश्विनी गोरे, जिल्हा शल्यिचिकित्सक डॉ. धनंजय पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तानाजी लाकाळ, डॉ. अशोक कठारे, डॉ. नानासाहेब गोसावी, डॉ. सतिश आदटराव, डॉ. अमोल कापसे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य अब्दुल लतिफ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शासकीय रक्तपेढी विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 
Top