परंडा  / प्रतिनिधी-

  येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयांमध्ये इयत्ता बारावी  कला वाणिज्य व विज्ञान विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात आला.

 महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ दीपा सावळे यांच्या हस्ते कला वाणिज्य विज्ञान विभागांमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्या डॉ दीपा सावळे यांच्या सह कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक श्री दत्ता मांगले, कला विभागातील विविध विषयाचे सहशिक्षक, वाणिज्य विभाग व विज्ञान विभागातील विविध विभागातील सहशिक्षक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कला विभागातून कोरडे तेजस तुकाराम प्रथम , बनसोडे विशाखा अनिल दुतिय  आणि लोखंडे आकाश अमर हा तृतीय क्रमांकाने महाविद्यालयातून उत्तीर्ण झाला आहे.  वाणिज्य विभागातून बुरंगे कोमल संतोष प्रथम , मोरे आलिशा परशुराम द्वितीय,  थवरे धनश्री विष्णू तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान विभागातून गायकवाड मंथन बालाजी हा प्रथम , पाटील ओंकार सदाशिव दुतीय  तर पौळ विशाल संजय हा तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. 

  विज्ञान विभागांमध्ये जीवशास्त्र विषयात  तीस विद्यार्थ्यांनी 90 टक्के च्या वर मार्क्स मिळवले आहेत. यामध्ये शिंदे प्रीती दिलीप 99 मार्क्स ,लटके कल्याण  जय देव 99 मार्क्स आणि डाके वैष्णवी नागेश 98 मार्क्स मिळविले आहेत. रसायनशास्त्र विषयांमध्ये नऊ विद्यार्थ्यांनी नव्वद टक्के च्या वर  मार्क्स मिळवले आहेत. यामध्ये पाटील ओंकार सदाशिव यांने 93 मार्क्स तर गायकवाड मंथन बालाजी यांने 95 मार्क्स मिळविले आहेत. मराठी विषयांमध्ये नव्वद टक्केच्या वर असणारे विद्यार्थी कु. गोरे पूजा राजेंद्र 91 मार्क्स, स्नेहल संजय 90 मार्क्स, पाटील ओंकार सदाशिव 90 मार्क्स.

  हिंदी विषयांमध्ये नव्वद टक्केच्या वर मार्क्स मिळविलेले एकूण 76 विद्यार्थी आहेत. त्यामध्ये मोरे आलिशा परशुराम 96 ,कदम हर्षद चंद्रकांत 96,  नाईकवाडी ऋतुजा संतोष 96 मार्क्स .राज्यशास्त्र विषयात तेजस तुकाराम करडे 96 , घोगरे निकिता 91  बिडवे काजल सतीश 90 मार्क्स . समाजशास्त्र विषयांमध्ये ही दोन विद्यार्थ्यांनी ९० च्या वर मिळविले आहेत. श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

 यावेळी कनिष्ठ विभागाचे परिक्षा प्रमुख श्री शंकर कुटे, श्री संतोष भिसे, श्री बि डी माने ,श्री दिपक हूके ,श्री तानाजी फरतडे, श्री किरण देशमुख, श्री उत्तम कोकाटे, श्री अंकुश शंकर श्री विलास गायकवाड, श्री प्रताप घुटे, श्री संभाजी धनवे, श्री केशव शेटे, श्री ज्योतिबा शिंदे, श्री रामेश्वर गायकवाड, सौ मोरवे, सौ माने प्रतिभा, सौ पायघन कीर्ती, यांच्या सह महाविद्यालयातील आई क्यू एसी चेअरमन डॉ महेश कुमार माने ,स्टाफ सेक्रेटरी डॉ शहाजी चंदनशिवे आदी सहशिक्षक यावेळी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top