वाशी/ प्रतिनिधी-

 शहरातील  विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक कार्यक्रम लागला होता त्या निवडणूकीत भाजपा , शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाच्या वतिने तिन पॅनलमध्ये निवडणूक होणार आशे चित्र आसतानाच   दि. २जून रोजी. राट्रवादी, भाजपा, शिवसेनाच्या नेतेमंडळीने सोसायटी बिनविरोध काढण्यात एकोपा झाल्यामूळे हि सोसाटी  बिनविरोध निघाली आहे. या बिनविरोध मध्ये पहिले चेरमन पद आडीच वर्षे भाजपच्या  वाटयाला आले आहे. तर एक वर्षे राष्ट्रवादीचा चेरमन व दिडवर्षे शिवसेनेचा चेअरमन अशा पद्धतिने तिन पक्षाची वाटाघाटी होऊन   सोसायटीची बिनविरुद्ध निघाली आहे .

 वाशी शहरातील  विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या एकूण  १३ संचालक पदासाठी सन २०२२ - २०२७ साठी पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात झाला होता. यासाठी सर्वच पक्षाच्या वतिने एकूण ५३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये छाननीमध्ये चार अर्ज अवैध ठरविण्यात आले होते. तर दि. २ जून रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी छत्तीस उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतल्यामुळे सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. डी. कदीरे यांनी जाहीर केले. सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाचे सुरेश कवडे, शिवसेनेचे प्रशांत चेडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मच्छिंद्र कवडे यांनी पुढाकार घेतला. यामध्ये भाजपाचे सहा, शिवसेना चार तर राष्ट्रवादीचे तीन संचालक बिनविरोध निवडूण देण्यात आले.

सोसायटीचे संचालक म्हणून सर्वसाधारण कर्जदार मतदार संघामधून नानासाहेब मोहनराव कवडे, सुभाष सदाशिव जगताप, अरुण कल्याण कवडे, संभाजी निवृत्ती उंदरे, बालाजी गौतम कवडे, दत्तात्रय देविदास कवडे, मधुकर गोपाळ जगताप, सुर्यकांत शहाजीराव सांडसे, महिला राखीव मतदार संघामधून रत्नमाला सदाशिव पवार, इरफाना जुबेर काझी तर मागास वर्ग मतदार संघामधून शिवशंकर गणपतराव चौधरी, अनुसुचित जाती/जमाती प्रवर्ग मतदार संघातून बाळासाहेब पंडितराव सुकाळे, भटक्या विमुक्त जाती/जमाती मतदार संघातून प्रध्युम्न बळीराम केळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. संचालक निवडीची घोषणा होताच भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.


 
Top