उस्मानाबाद / प्रतिनिधी -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला. त्यांनी आवाहन केल्याप्रमाणे हारतुरे आणू नये असे आवाहन केले होते तरीही उत्साही कार्यकर्ते व सहकारी यांनी माञ त्यांना ओझ होईल एवढे मोठे हार व पुष्पगुच्छ आणत सत्कार केले.

डॉ.प्रतापसिंह पाटील  यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी नऊ वाजल्यापासून सहकारी मित्र, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवरानी  शुभेच्छा देण्यासाठी सकाळी नऊ ते रात्री अकरापर्यंत सातत्याने गर्दी केली होती.दुपारी संततधार पाऊस असताना देखील कार्यकर्त्यांची रीघ माञ कमी होत नव्हती,प्रत्येक कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यांतील विविध पक्षाचे कार्यकर्ते व नेते यांनी प्रत्यक्ष भेटुन शुभेच्छा दिल्या. तसेच विविध पत्रकार बांधवांनी ही त्यांना वाढदिवसानिमित्त भेटुन शुभेच्छा दिल्या.राज्यातील व जिल्हयातील दिग्गज नेत्यांनी डॉ.प्रतापसिंह पाटील यांना भ्रणध्वनीवरून  शुभेच्छा दिल्या.

 डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीर.

 उस्मानाबाद येथील डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल येथे धनेश्वरी शिक्षण समुहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते,यामध्ये १२० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी या शिबिराचे उद्घाटन उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष श्री सचिन तावडे श्री अमोल सुरवसे श्री मनोज मुदगल,राहुल आडमुटे,अक्षय खवले,महेश पारेकर यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शैक्षणिक संकुलातील सर्व प्राचार्य, प्राध्यापक,विद्यार्थी इतर मान्यवर उपस्थित होते.

 डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गडदेवदरी येथे वृक्षारोपण.

  गडदेवदरी ता-उस्मानाबाद येथे धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह जी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी महाविद्यालय आळणी गड पाटी उस्मानाबाद यांच्यावतीने गडदेवदरी येथील डोंगराईत वृक्षारोपण करण्यात आले,सुमरे 125 एकर मध्ये कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर नियोजित इंडियन डेन्स फॉरेस्ट,मेडिटेशन सेंटर विकसित प्रकल्पाच्या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यामध्ये विविध औषधी वनस्पती, फळझाडे अशा अनेक झाडांची लागवड यामध्ये करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. क्रंतिकुमार पाटील सर,व्यवस्थापकिय संचालक प्रा.हरि घाडगे  पाटील मॅडम,प्रा.बुरगुटे सर,प्रा.शेटे सर प्रा.भालेकर सर,प्रा.साबळे, प्रा. साठे, प्रा.जगधने यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

 
Top