उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आज उस्मानाबाद येथे जिल्हा पर्यटन विकास समितीच्या वतीने उस्मानाबाद शहराजवळील असलेल्या धाराशिव लेण्या परिसरात योगसाधना करण्यात आली. 

या निमित्तानं जिल्हा पर्यटन विकास समितीने केलेल्या आवाहनाला रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रतिसाद देत योगसाधनेमध्ये आणि स्वच्छता अभियानात सहभाग दिला.जागतिक योग दिनानिमित्त वारसा स्थळांच्या ठिकाणी योगसाधना करावी या सरकारच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा पर्यटन विकास समितीने हा उपक्रम राबवला. या उपक्रमात जिल्हा पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष युवराज नळे यांनी लेण्यासारख्या ऐतिहासिक वास्तुचे जतन करणे आपल्या सर्वांची जबाबदारी असुन विद्यार्थ्यांना योग्य असे मार्गदर्शन केले. या योग साधनेनंतर जिल्हा पर्यटन विकास समितीच्या सदस्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह धाराशिव लेणी परिसरातील प्लास्टिक तसेच कचरा एकत्र करून त्याची विल्हेवाट लावली. वारसा स्थळांच्या जतन संवर्धन आणि योगसाधनेचा हा उपक्रम जिल्हा पर्यटन विकास समितीने या वर्षी प्रथमच हाती घेतला होता.

यात प्रामुख्याने पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष युवराज बप्पा नळे,सचीव देविदास पाठक,धर्मवीर कदम, अब्दुल लतिफ,गणेश रानबा वाघमारे, शेषनाथ वाघ,बाबा गुळिग,अभिमान हंगरेकर,रविंद्र शिंदे,विजय गायकवाड,खंडु आप्पा झोंबाडे,नितिन बनसोडे,सुजीत बेद्रे,अमोल माळी, राजेंद्र पेठे, सत्यहरी वाघ सहित इतर अन्य सहकारी उपस्थित होते.कार्यक्रमाची प्रस्तावना धर्मवीर कदम यांनी केली तर आभार गणेश वाघमारे यांनी मानले.


 
Top