परंडा / प्रतिनिधी : -

 माणिकबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेळगाव ता.परांडा या विद्यालयाचा इ.१० वी.व इ.१२ वी.वर्गाचा निकाल १००% लागला मुळे ग्रामपंचायत शेळगाव, ग्रामस्थ पालक  व शिवशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ शेळगाव आणि विद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सत्कार विद्यालयात आयोजित करण्यात आला.

या वेळी संस्थेचे अध्यक्ष तथा परांडा तालुक्याचे जेष्ठ नेते ॲड.सुभाषराव मोरे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून शेळगाव ग्रामपंचायतच्या सरपंच सुलोचना विष्णू शेवाळे या होत्या , बाणगंगा साखर कारखान्याचे संचालक विष्णू (नाना) शेवाळे, माजी प्राचार्य संभाजीराव मोरे माजी प्राचार्य सुधाकर खरसडे,उप सरपंच राजेंद्र जगताप, प्राचार्य गुरुदास काळे, बाबु(आप्पा)दैंन,पालक तथा युवा नेते विलास मोरे, अशोक दैंन, पालक, ग्रामस्थ व विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.या वेळी इ.१०वी.वर्गातुन प्रथम क्रमांक कु.कोकणे विश्वल रंगनाथ 95.8.% द्वितीय क्रमांक जाधव आदेश तुकाराम 94.60% व तृतीय क्रमांक कु.मोरे ऋतुजा विलास 94.00% तर इ12वी.प्रथम क्रमांक कु.दैन आकांक्षा अशोक 88.50%, द्वितीय क्रमांक कु.मोरे तेजल बाळासाहेब 86.50%, तृतीय क्रमांक कु.मोहळकर राधिका हरिदास 82.33% या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .व गुणवंत विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत शेळगाव यांच्या वतीने प्रथम क्रमांक 2500, द्वितीय क्रमांक 1500,व तृतीय क्रमांक 1000 रूपये असे बक्षीस देण्यात आले.तसेच प्रत्येक वर्षी इ10वी.व इ.12वी मध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना वरील प्रमाणे रोख बक्षीस देण्याचे ग्रामपंचायत शेळगाव यांच्या वतीने जाहीर करण्यात आले.

या वेळी ॲड.सुभाषराव मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन  पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या,या वेळी विष्णू (नाना) शेवाळे,संभाजीराव मोरे सुधाकर खरसडे इत्यादींनी मार्गदर्शन केले तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे व विद्यालयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.


 
Top