तुळजापूर/  प्रतिनिधी : -

 लोहारा  पोलीस स्थानकात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनीता बळीराम कदम  यांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाली आहे . पोलीस खात्यांतर्गत सुनीता कदम यांना पोलीस उपनिरीक्षक पदी  पदोन्नती दिली आहे. हे १९८५ सालापासून पोलीस सेवेत कार्यरत असलेले सुनीता कदम  यांनी आपल्या अखंड सेवेत प्रामाणिकपणा , शिस्तप्रिय याबरोबरच कर्त्यव्यनिष्ठ पोलीस कर्मचारी म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे .

  मुळचे तुळजापूर  येथील रहिवासी असलेले श्रीमती कदम  यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील तामलवाडी,लोहारा ,तुळजापूर , ई . पोलिस स्थानकात आपले कर्त्यव्य बजावले आहे . सामान्य माणसाला पोलीस हे मित्र वाटायला हवे त्यांच्यामध्ये सुसंवाद असावा यासाठी ते नेहमी आग्रही राहिले आहेत . त्यांना मिळालेल्या पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती व नंतर अनेक स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदन होत आहे . यावेळी लोहारा पोलिस पोलीस  ठाण्याचे एपीआय नेरवडे ,पीएसआय। वाढोरे आणि पोलिस ठाण्याच्या वतीने नुकत्याच आयोजित केलेल्या  कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला .याप्रसंगी अधिकारी,पोलिस कर्मचारी आदी उपस्थित होते.

 
Top