उस्मानाबाद / प्रतिनिधी-

नीती आयोगाच्या मागास जिल्ह्यातील सुचीमधील जिल्ह्यात स्वयंरोजगार निर्मितीसाठी महिलांमध्ये शहरी अथवा ग्रामीण असा भेदाभेद न करता वित्तीय साहाय्य व प्रशिक्षण मिळण्याबाबत भाजपा महिला मोर्चा उस्मानाबादच्या वतीने . राज्यअर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांना  निवेदन देण्यात आले.हे  निवेदन   आमदार राणाजगजीतसिंह पाटील, भाजपाचे मराठवाडा संघटनमंत्री संजयजी कौडगे   यांच्या उपस्थितीत  देण्यात आले. 

 िनवेदनावर भाजपा महिला मोर्चा उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अर्चनाताई अंबुरे, जिल्हा उपाध्यक्ष विद्याताई माने, ओबीसी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष छायाताई खराटे, उमरगा तालुकाध्यक्ष सुलोचनाताई वेदपाठक, भुम तालुकाध्यक्ष लताताई गोरे, कळंब शहराध्यक्ष संगिताताई कोकीळ, मराठवाडा उपाध्यक्ष युवती मोर्चा पुजा देडे, युवा सरचिटणीस देवकन्या गाडे यांच्या सह्या आहेत.


 
Top