उस्मानाबाद / प्रतिनिधी-

नळदुर्ग येथील भीमा रघुनाथ गायकवाड , वय 53 वर्षे सहाय्यक पोलीस उप निरीक्षक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले असून २ हजाराची लाच मागून १५०० रुपये स्वीकारल्याने ताब्यात घेण्यात आले आहे. 

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार या वकील असून त्यांनी पोलीस स्टेशन नळदुर्ग गु. र. न. 88/2022 गुन्ह्यातील आरोपीतास कोर्ट कामकाजात मदत केली होती सदर आरोपीतास मा. न्यायालय तुळजापूर यांनी  न्यायालयीन कोठडी मंजूर केल्याने आरोपींना कारागृहात दाखल करण्यापूर्वी लोकसेवक गायकवाड यांनी तक्रारदार यांच्याकडे सदर आरोपीस जेवण  देण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी पंचांसमक्ष 2000 रुपये लाच रकमेची मागणी करून तडजोडी अंती 1500 रु लाच रक्कम स्विकारल्याने सदर आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.सापळा पथकात - पोअ/  मधुकर जाधव, अर्जुन मारकड, सचिन शेवाळे, सिद्धेश्वर तावसकर ,विष्णु बेळे , विशाल डोके, जाकीर काझी , नागेश शेरकर ला.प्र.वि, उस्मानाबाद.यांनी काम पाहिले.

 
Top