उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  कम्युनिटी पोलीसींग स्कीम अंतर्गत ढोकी पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि- श्री जगदीश राऊत यांसह पथकाने   उस्मानाबाद तालुक्यातील भंडारवाडी गावातील जिल्हा परिषद शाभ येथे भेट देउन ग्रामस्थांना ग्रामसुरक्षा दल, सीसीटीव्ही या संदर्भात माहिती देउन यातून चोरी, घरफोडी इत्यादी गुन्ह्यास प्रतिबंध कसा करता येतो याचे महत्तव पटवून दिले. 

तसेच जि.प. शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थीनींना पोलीस काका, पोलीस दिदी यांची ओळख करुन देउन पोलीसांविषयी समज- गैरसमज, वाहतुक नियम, बाललैंगीक अत्याचार, व्यसनमुक्ती, गुड टच-बॅड टच, हेल्प लाईन 112, 1098 तसेच सोशल मिडियां विषयीच्या गुन्ह्या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.

 
Top