उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद येथील  फ्लयीनग किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल मध्ये बाजार दिवस आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन सेक्रेटरी आदर्श शिक्षक प्रसारक मंडळ उस्मानाबाद व नगरसेविका उस्मानाबाद सौ. प्रेमा सुधीर पाटील  व प्राचार्य चांद्रमानी चतुर्वेदी यांच्या हस्ते झाले.  यावेळी   शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

 या कार्यक्रमाच्या आयोजना मागे विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारिक ज्ञान चांगल्या प्रकारे शिकावे व अवगत व्हावे या उद्देशाने बाजा दिवस हा कार्यक्रम करण्यात आला यावेळी विद्यार्थ्याने आणलेल्या वस्तू विकून व्यवहार कसा करावा हे त्यांना शिकता आले विद्यार्थ्यांनी घरून वेगळे वेगळे पदार्थ तयार करून विकण्यासाठी आणले होते त्यामध्ये पावभाजी भेळ पाणीपुरी वडापाव मिसळ पाव पोहे ढोकळा कचोरी तसेच फळे व इतर पदार्थ आणले होते. तसेच पालकांनी यावेळी  विद्यार्थ्याने तयार करून  आणलेले पदार्थ    खरेदी करून वेगवेगळे पदार्थ खाण्याचा आनंद लुटला 

यावेळी शाळेतील अखिलेश देव पाठक सर तसेच राहुल मल. शुभम सिंह. तसेच सोनाली मॅडम. जगताप मॅडम. राजश्री मॅडम. नंदा उबाळे कार्यक्रमास सहकार्य केले.

 
Top