लोहारा/प्रतिनिधी

लोहारा तालुक्यातील आष्टा कासार तालुका लोहारा येथे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी धाराशिव महेश तिर्थकर व तालुका कृषी अधिकारी लोहारा मिलिंद बिडबाग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. 

कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना, महात्मा गांधी रोजगार हमी  योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना तसेच आत्मा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेबाबत माहिती देण्यात आली. शेतकर्यांनी घरी राखून ठेवलेले बियाणे पेरणीसाठी वापरावे व त्याच बरोबर 80 - 100 मिमी पाऊस झाल्यानंतर बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी असे, आवाहन आष्टा कासारचे कृषी सहायक पवार सचिन यांनी केले. 

यावेळी मंडळ कृषी अधिकारी रवी बनजगोळे , कृषी सहाय्यक सचिन पवार, सरपंच सौ.सुलभा कांबळे, उपसरपंच वसंतराव सुलतानपूरे, मुकेश मुळे, सिद्राम तडकले, जिनेन्द्र कासार, सुरज खैराटे, पिंटू मदने, सर्व महिला बचत गट, महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top