परंडा /  प्रतिनिधी : - 

इतिहासातील एक अजरामर असा दिवस म्हणजेच शिवराज्याभिषेक सोहळा असे प्रतिपादन शिक्षण महर्षी गुरुवर्य  रा.गे . शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ दीपा सावळे यांनी महाविद्यालयात आयोजित केलेल्या शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमात अध्यक्ष समारोप करताना व्यक्त केले. 

  महाराष्ट्र शासनाचे शिक्षण संचालनालय उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पत्र क्रमांक शिस्वदि०४ २१/प्र.क्र. ०२/मवि -१६०९१ दिनांक ३ जून २०२२ नुसार सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . 

 श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय आणि संत गाडगेबाबा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.       यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून प्राचार्या डॉ दीपा सावळे या उपस्थित होत्या तर व्यासपीठावर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे , आयक्युएसी चेअरमन डॉ महेशकुमार माने ,  गणित विभागप्रमुख प्रा डॉ विद्याधर नलवडे, कनिष्ठ विभागाचे प्रा संभाजी धनवे, प्रा शंकर कुटे आदि  उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले.

 यावेळी विज्ञान विभागाचा विद्यार्थी लक्ष्मण शेजवळ याने  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  स्वराज्य संकल्पना या विषयी मनोगत व्यक्त केले तर कला विभागाची विद्यार्थिनी आरती नलवडे हिने छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला.अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्या डॉ दीपा  सावळे पुढे म्हणाल्या कि शिवरायांनी 1674  पर्यंत स्वराज्याचा विस्तार खूप वाढला होता तरीही तोपर्यंत शिवराय हे तांत्रिक दृष्ट्या मोगली मनसबदार होते.मोगलांची चाकरी बजावणारे मातब्बर मराठा सरदार तसेच विजापुरी बादशहा मोगलांना आदिलशहा पेक्षा कमी लेखत शिवरायांनी आपल्या कर्तबगारीने मनगटाच्या बळावर आपले स्थान निर्माण केले होते.त्याला एक कायदेशीर स्वरूप देणे गरजेचे होते.राज्य स्थापन करण्याची जरुर होती शिवरायांचा राज्याभिषेक झाला पाहिजे अशी सुप्त इच्छा प्रजेच्या संवर्गात पसरली होती.आणि तिच इच्छा इतिहासात एक अजरामर असा सोहळा ठरला.

 परकीय सत्तांचे वरवंटे महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानच्या छाताडावर थयाथया नाचत असताना सतराव्या शतकात शिवनेरीवर जन्म दिला तो एक निखारा पुढील काही वर्षात विक्राळ रूप धारण करत जणू त्या परकीय सत्तांना त्याच्या अविरत तेजाने भस्मसात करतो आणि कित्येक वर्षाची असलेले गुलामगिरीचे जोखड भिरकावून देत अखिल मराठी मातीला जण स्वाभिमानाचे सार्वमत वसलेली हक्काचे 32 मन सुवर्ण सिंहासन उभे करत गोरगरीब रयतेला हक्काच्या शतकात निर्माण करतो असे मत व्यक्त केले.

 या कार्यक्रमासाठी कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा सचिन साबळे, हनुमंत मार्तंडे , अरुण माने यांनी सहकार्य केले.शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रा डॉ विद्याधर नलवडे यांनी मानले.

 
Top