उस्मानाबाद / प्रतिनिधी-

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या आठ वर्ष पूर्तीनिमित्त 7 ते 13 जून या कालावधीत सप्ताहभर विविध कार्यक्रमांचे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त धाराशिव येथील प्रतिष्ठान भवन भाजपा कार्यालयात युवा मोर्चाचे मराठवाडा समन्वयक अरुण पाठक, धाराशिव जिल्हा प्रभारी अमोल निडवदे, जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा पदाधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेले लोककल्याणकारी निर्णय व योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन सर्वांनी केले.

 श्री.पाठक यांनी माहिती सांगतांना देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार 2014 साली केंद्रात आल्यानंतर विविध लोककल्याणकारी निर्णय आणि योजना राबविल्या आहेत. श्रीराम मंदिराचा सर्वांच्या आस्थेचा प्रश्न चुटकीसरशी निकाली लावला. प्रधानमंत्री किसान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकर्‍याच्या खात्यात मदत करण्याचे काम निरंतर सुरु आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची अंमलबजावणी करुन माता-भगिनींना चुलीच्या धुरामुळे उद्भवणार्‍या दमा, डोळ्यांचे आजार यापासून मुक्ती देण्याचे काम केले आहे. आत्मनिर्भर भारत योजनेद्वारे बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.  मुद्रा लोन, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, अटल पेन्शन योजना अशा कितीतरी योजनांचा लाभ आज सर्वसामान्यांना मिळत आहे. ही सुशासन व्यवस्था देशभर केवळ भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारमुळेच देशाला मिळाली असल्याचे सांगून युवा मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विकास तीर्थ बाईक रॅलीमध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवाव्यात असे आवाहनही त्यांनी केले.

 यावेळी उपस्थित पदाधिकार्‍यांनीही सप्ताह कालावधीत राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली.

 उस्मानाबाद जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या परंडा ते तुळजापूर विकास तीर्थ बाईक रॅलीबाबत युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच धाराशिव भारतीय जनता युवा मोर्चाचा कार्य अहवाल या बैठकीमध्ये सांगीतला तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आ.राणाजगजितसिंह पाटील व सुजितसिंह ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली भारतील जनता युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तन मन धनाने झटुन जिल्हयातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थावर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करतील व संघटन मजबुत करतील असे आश्वासक विचार मांडले. विकास  बाईक रॅलीची सुरुवात परंडा तालुक्यातुन होणार असुन ती भुम, वाशी, कळंब, धाराशिव, लोहारा, उमरगा येथील  विविध ऐतीहासिक तसेच धार्मिक स्थळी भेट देऊन मोठया गावांमध्ये रॅली काढुन मोदीजींचे विकास कार्य व केंद्र शासनाच्या लोकउपयोगी विविध योजना सर्व जनते पर्यंत पोहचविणार आहोत. या रॅलीचा समारोप कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या श्रीक्षेत्र तुळजापुरात करणार आहोत. या रॅलीमध्ये त्या-त्या तालुक्यातील युवा मोर्चाचे सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी व शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी केले.

 यावेळी बाईक रॅलीच्या ध्वजाचे अनावरण सर्व युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मराठवाडा युवती संयोजिका सोनाली पाटील, युवा मोर्चा प्र.का.सदस्य मकरंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संताजी मोहन वीर, रोहीतराज विजय दंडनाईक, अमित माकोडे,  स्वप्नील नवनाथ नाईकवाडी, प्रविण बिभीषण घुगे, ॲड.पवार संदीप, तालुकाध्यक्ष ओम नाईकवाडी, साठे शुभम शिवाजी, शहर अध्यक्ष सुजित साळुंके, रोहित कोमटवार, जिल्हा चिटणीस गणेश इंगळगी, निलेश पाटील, किशोर दत्तप्रसाद, प्रितम मुंडे, गणेश भोगील, गिरीष पानसरे, गणेश एडके, सुरज शेरकर, आत्मनिर्भर संयोजक, सचिन लोंढे, विद्यार्थी जि.संयोजक विशाल पाटील, तालुका सरचिटणीस अशोक महाजन, तालुका चिटणीस सागर पाटील, सह संयोजक आत्मनिर्भर सलमान शेख, जिल्हा सह संयोजक भोसले लक्ष्मण, निलेश दिवाणे, तालुका कार्याध्यक्ष रोहित पाटील, जिल्हा सचिव रियाज पठाण, रोहित देशमुख, मिडीया प्रमुख संदिप कोकाटे, तसेच हिम्मत भोसले, अजित खापरे, किशोर तोरडमल, सार्थक पाटील, प्रसाद मुंडे, अजय उंबरे, ओवांडकर आशीष, ओवांडकर विनायक, दिपक आळंगे, पियुश पाटील, अजय कोरडे, विक्रम राजपुत, धनराज नवले, ओवांडकर किरण, मोहन डोलारे, प्रमोद लिमकर, अरविंद रगडे, निरंजन जगदाळे, मनोजसिंह ठाकुर, ओंकार देशमुख, राजेश्वर कदम, उंबरे अजय शेषेराव, संजय नेमाने, राजकुमार बोंदर, ओंकार देवकते, अरविंद देवकते, सोलंकर नवनाथ, रुपन ऋषिकेश, रोहित पाटील, धनराज नवले आदीसह युवा मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top