अवैध मद्य जप्त करत १८ गुन्हयांची नोंद 

उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद पोलीसांनी  रविवार दि. 13 जून रोजी जिल्हाभरात अवैध मद्य विरोधी 18 कारवाया करुन गुन्ह्यातील हातभट्टी दारु निर्मीतीचा द्रव पदार्थ नाशवंत असल्याने पोलीसांनी तो जागीच ओतून नष्ट केला. तसेच अवैध मद्य जप्त करुन संबंधीत व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 18 गुन्हे नोंदवले आहेत.

यामध्ये शिराढोन पोलीसांनी सात ठिकाणी छापे टाकले असता शिलाबाई काळे या शिराढोन येथील एकुरगा रस्त्याकडेला 7,500 ₹ किंमतीची हातभट्टी दारु बाळगलेल्या, शालुबाई पवार या मंगरुळ येथे 900 ₹ किंमतीची हातभट्टी दारु बाळगलेल्या, दत्ता आल्टे हे वाठवडा गावातील आपल्या पत्रा शेडजवळ 500 ₹ किंमतीची हातभट्टी दारु बाळगलेले, लताबाई पवार या नागुलगाव येथील आपल्या घरात 1,300 ₹ किंमतीची हातभट्टी दारु बाळगलेल्या, सुरेश गरड हे नायगाव शिवारात 12 बाटल्या देशी दारु, सिमा काळे या पारधी पिढी, शिराढोन येथील आपल्या घरासमोर 15 लि. हातभट्टी दारु, तर अमोल सावंत हे शिराढोन येथे 9 लि. हातभट्टी दारु बाळगलेले असताना आढळले.

तर लोहारा पोलीसांनी दोन ठिकाणी छापे टाकले असता नजीर सय्यद हे माकणी गावात 17 बाटल्या देशी दारु तर विकास गायकवाड हे उदतपुर गावात आपल्या घरासमोर 45 बाटल्या देशी दारु बाळगलेले असताना आढळले.

तसेच येरमाळा पोलीसांना बालाजी जाधवर हे वडजी गावात 9 लि. हातभट्टी दारु बाळगलेले असताना आढळले. तर परंडा पोलीसांना दादा ढगे हे वांगी (खु.) गावातील मंदीरामागे 26 बाटल्या देशी दारु बाळगलेले असताना आढळले. तर उमरगा पोलीसांना दत्तात्रय थोरात हे गुंजोटी गावातील आपल्या घराजवळ 15 लि. हातभट्टी दारु बाळगलेले असताना आढळले. तसेच उस्मानाबाद (श.) पोलीसांना संगीता काळे या पारधी पिढी, उस्मानाबाद येथे 60 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या असताना आढळल्या. तर  अंबी पोलीसांना किरण भांडवलकर हे वाटेफळ गावतील एका हॉटेलजवळ 20 बाटल्या देशी दारु बाळगलेले असताना आढळले.तसेच नळदुर्ग पोलीसांना सुर्यकांत जाधव हे आरळी (बु.) गावात 20 लि. हातभट्टी दारु बाळगलेले असताना आढळले.तर  आनंदनगर पोलीसांना ज्योती शिंदे या शिंगोली शिवारातील एका पत्रा शेडसमोर 2,000 ₹ किंमतीची हातभट्टी दारु बाळगलेल्या असताना आढळल्या.तसेच  उस्मानाबाद (ग्रा.) पोलीसांना बालाजी कांबळे हे कायापूर येथील आपल्या शेतात 6,920 ₹ किंमतीची देशी- विदेशी दारु बाळगलेले असताना आढळले.तर  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास दशरथ कदम हे आंबेवाडी शिवारातील आपल्या शेतात 4 खोक्यांत 192 बाटल्या देशी दारु बाळगलेले असताना आढळले.

 
Top