परंडा / प्रतिनिधी-

येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे  शिंदे महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे प्राध्यापक संतोष काळे यांना नुकतीच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाने पीएचडी प्रदान केली आहे . 

काळे यांनी अ स्टडी ऑफ इन्वेस्टर बिवीएअर इन कॅपिटल मार्केट ऑफ महाराष्ट्र स्टेट या विषयावर आपला प्रबंध सादर केला होता. त्यांना शंकरराव पाटील महाविद्यालय भूम येथील वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर भोसले यांचे मार्गदर्शन लाभले आहे.त्यांचा  महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्या डॉ दीपा सावळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील आयक्यूएसी चे चेअरमन डॉ महेशकुमार माने , स्टाफ सेक्रेटरी डॉ शहाजी चंदनशिवे , ग्रंथपाल डॉ  राहुल देशमुख , शारीरिक शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख डॉ कृष्णा परभणे आदी उपस्थित होते. 

यावेळी डॉ  शहाजी चंदनशिवे , डॉ अरुण खर्डे , कनिष्ठ विभागाचे प्राध्यापक उत्तम कोकाटे यांचा वाढदिवसही यावेळी साजरा करण्यात आला.प्राचार्या डॉ दीपा सावळे यांनी त्यांना  बुके देऊन त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

 
Top