उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नौकरीस असलेल्या महिलेचे ढोकी येथीलच एकाशी अनैतिक संबंध होते. या पत्नीच्या संबंधास वैतागून मुळ कोंड येथील रहिवाशी असलेल्या त्या महिलेच्या पतीने कोंड शिवारातील स्वत:च्या शेतात झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना रविवारी (दि.5) सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी पत्नीसह तिच्या प्रियकरावर मयताचा भाऊ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोंड येथील स्वाती सतीश तिवारी ही महिला परिचारिका म्हणून कार्यरत आहे. तिला व पती सतीश कवरसिंग तिवारी यांना एक मुलगा व एक मुलगी असे दोन अपत्तेही आहेत. सतीश तिवारी हा त्याच्या पत्नीसोबत ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्वॉर्टमध्ये राहत होते. मात्र तीन वर्षापासून सतीश व त्याची पत्नी स्वाती या दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयावरुन वाद सुरू होता. दरम्यान 31 मे 2022 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्रातील क्वार्टरमध्ये सतीश हा गेला असता त्याला त्याच्या क्वार्टरमध्ये ढोकी येथील विवेक देशमुख व स्वाती हे एकत्र रुममध्ये संशयास्पद दिसले. त्यावरून सतीश याने त्या दोघांना जाब विचारला असता त्याला सतीशची पत्नी स्वाती व तिचा प्रियकर विवेक देशमुख या दोघांनी बेदम मारहाण केली. दरम्यान सतीश याने ढोकी पोलीस ठाण्यात रितसर तक्रारही दाखल केली आहे. या प्रकारानंतर सतीश तिवारी यांना पत्नीची वागणूक आवडत नसल्यामुळे तो पत्नीला वेळोवेळी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता. मात्र ती त्याचे ऐकत नव्हती. यामुळे सतीश हा या प्रकारामुळे त्रास होता. या त्रासास वैतागून त्यांनी रविवारी (दि.5) त्याच्या कोंड शिवारात शेतामध्ये झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. अशी फिर्याद सतीशचा भाऊ उमेश कवरसिंग यांनी ढोकी पोलीस ठाण्यात दिल्याने पत्नी स्वाती व तिचा प्रियकर विवेक देशमुख या दोघावर कलम 306 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास ढोकी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक राऊत यांच्या आदेशावरुन पोलिस उपनिरीक्षक बुधेवार हे करत आहेत.

 
Top