उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्हा पशुसंवर्धन विभाग कार्यालयाकडून 2022-23 या आर्थिक वर्षात विविध योजनेसाठी दि.27 जून ते 27 जुलै 2022 या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.

यामध्ये अनुसूचित जाती, नवबौध्द लाभार्थींना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणे, दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम (वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम), नावीन्यपूर्ण योजनंतर्गत  विधवा महिलांना 100 टक्के अनुदानावर दोन (02) शेळीगट वाटप करणे (जि.प.उपकर), नावीन्यपूर्ण योजना दिव्यांगाच्या कुटुंबांना 100 टक्के अनुदानावर दोन (02) शेळीगट वाटप करणे (जि.प.उपकर योजना).

दि.28 जुलै 2022 नंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी आपल्या कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकीय दवाखाने, पशुधन विकास अधिकारी (वि.) पंचायत समिती येथे संपर्क साधावा. अर्जाचा विहीत नमुना, मार्गदर्शक सूचना, नियम, अटी सोबत जोडावयाची कागदपत्राची सूची पंचायत समितीतील (सर्व) पशुसंवर्धन विभागात उपलब्ध करण्यात आलेले आहेत. तसेच उस्मानाबाद एनआयसी.इन(osmanabad.nic.in) या संकेतस्थळावर अर्जाचे नमुने उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तरी जास्तीत जास्त लाभार्थींनी वरील योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जि.प.चे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी वाय.बी.पुजारी यांनी केले आहे.

 
Top