उस्मानाबाद / प्रतिनिधी-   

देशभरात हिंदूंच्या सण उत्सवांवर हल्ले होत आहेत. काही दिवसांपूर्वी रामनवमी, हनुमान जन्मोत्सवाच्या शोभायात्रेवर झालेले हल्ले असोत, ज्ञानवापी येथील शिवलिंगाचा व इतर हिंदू देवतांचा वारंवार जाणीवपूर्वक अवमान केला जात आहे.   या सर्व प्रकारच्या  हल्ल्यांच्या व हिंसक घटनांच्या विरोधात बजरंग दलाच्या वतीने जिल्हा मुख्यालयात धरणे देऊन उस्मानाबाद जिलाधिकारी मार्फत  राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.

  यावेळी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक अ‍ॅड. विक्रम साळुंके, विश्व हिंदू परिषद जिल्हामंत्री श्रीकृष्ण धर्माधिकारी, विंहिंप जिल्हाध्यक्ष श्री दत्तात्रय चवरे, विंहिंप विशेष संपर्कप्रमुख अ‍ॅड प्रमोद झांबरे, श्री संतोष पोतदार सर, शहर सह संयोजक उमेश सुरवसे, तानाजी इंगळे, निखिल शेंडगे, अभिषेक कोळगे, शैलेश देव यांची प्रमुख उपस्थिती होती.

 
Top