उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उस्मानाबाद ओबीसी सेलच्या वतीने सद्यस्थितीत ओबीसी एम्पिरिकल डाटा तयार करण्याच्या पद्धतीमध्ये योग्य तो बदल करणे आवश्यक असल्याबाबत व तसेच ओबीसी प्रवर्गामध्ये येणाऱ्या जाती वरती प्रचंड अन्याय होण्याची शक्यता निर्माण झालेली असल्याने व तसेच आडनावावरून जात ठरवणे शक्य नसले बाबत व पुढील अनेक पिढ्यांचे नुकसान होणार असले बाबत सदरचा एम्पिरिकल डाटा तयार करत असताना योग्य ती पद्धत अवलंबून सदरचा एम्पिरिकल डाटा तयार करणे  याबाबत माननीय अध्यक्ष राज्य मागासवर्गीय आयोग महाराष्ट्र राज्य, यांच्या वतीने   जिल्हाधिकारी   कौस्तुभ दिवेगावकर  यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष ओबीसी सेल राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उस्मानाबाद  अॅड. विशाल साखरे ,महाराष्ट्र उपाध्यक्ष ओबीसी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  संतोष सोमांना भाकरे,  बाळासाहेब मल्हारी स्वामी, अॅड. विशाल प्रभाकर साखरे ,दत्तात्रय पुंडलिक पवार, लक्ष्मण भगवान राऊत ,दिलीप मुरलीधर राऊत, श्री माळी साहेब ,श्री प्रकाश बलभीम बाळबुधे, अॅड. महेश लोहार व दिलीप मुरलीधर राऊत व इतर ओबीसी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top