उस्मानाबाद / प्रतिनिधी-

नवी मुंबईच्या  कंठवली, उयण येथील गोर समाजाच्या धर्मपीठ असलेल्या भक्तनिवास व मंदिर सिडकोच्या अधिकाऱ्यांनी अनधिकृत असल्याचे घोषित करून जमीनदोस्त केले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय बंजारा परिषदेचेच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनावर  अध्यक्ष किसनराव राठोड, सदाशिव पवार, बाबुराव राठोड, चत्रु राठोड, मोहन राठोड, काशिनाथ आडे, अंबादास आडे, विष्णू राठोड, सचिन पवार, शहाजी चव्हाण, रामराव राठोड, अरुण आडे, सुखदेव चव्हाण, सचिन राठोड, राजू चव्हाण, अजित चव्हाण, कालिदास चव्हाण शुभम चव्हाण, ओंकार राठोड व बालाजी आडे आदींच्या सह्या आहेत.

 
Top