उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 अमली पदार्थाच्या दुष्परिणामाविषयी जनजागृती शपथ कार्यक्रम उस्मानाबाद जिल्हा परिषदेत घेण्यात आला.  युवकांमधील वाढती व्यसनाधिनता हा देशातील चिंतेचा विषय बनलेला आहे. व्यसनाधीनतेच्या विळख्यातून युवा पिढीला रोखण्यासाठी राज्यभर अमली पदार्थ दुष्परिणाम जनजागृती कार्यक्रम  आयोजित करण्यात आला होता.

 जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश केंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये अमली पदार्थ दुष्परिणाम जनजागृती शपथ उपस्थित अधिकारी,कर्मचाऱ्यांना देण्यात आली.

  यावेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन भोसले, माध्यमिक शिक्षणाधिकारी गजानन सुसर,प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बोडके,महिला व बालकल्याण विभागाचे कार्यक्रम अधिकारी बळीराम निपाणीकर, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी श्रीमती गायकवाड यांच्यासह जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती.

 
Top