तुळजापूर/ प्रतिनिधी- 

 तुळजाई नागरी सहकारी पतसंस्थेने गोरगरीबांना पतसंस्थेच्या माध्यमातून अर्थिक  मदतीचा हात दिला असुन त्यांनी  केलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे मत माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त  केले.

तुळजाई नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी काय॔क्रमानिमित्त संस्थेच्या सभासद, कर्जदार, ठेवीदार यांच्या गौरव काय॔क्रमात माजी मंत्री मधुकरराव चव्हाण बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक पंडितराव जगदाळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमर मगर, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, अॅड. अनिल काळे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब फासे, माजी नगरसेविका मंजुषा देशमाने,   संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशमाने, सुकन्या देशमाने,  उपाध्यक्ष खंडू ताठे, संजय देशमाने, संजय नाईक, लक्ष्मण नन्नवरे, महेश साबळे, अमजत शेख, आनंद माळी, कस्तुरबाई माळी, यास्मीन शेख, महानंदा व्हटकर, दिपाली क्षीरसागर, संजय ढवळे आदी   उपस्थित होते. 

  प्रास्ताविक  पंडितराव जगदाळे यांनी केले., विशाल सुय॔वंशी यांनी सुत्रसंचालन केले तर आभार व्हाईस चेअरमन के.टी. ताठे यांनी मानले. यावेळी रौप्य महोत्सवात प्रथम कर्जदार कैलासवासी महादेव भोजने यांचे पुत्र संतोष भोजने , गोरख भोजने, उद्धव माने, जगन्नाथ काळे, शेखर भोजने, सलीम शेख, यशवंत क्षीरसागर, राजेश जाधव, सुरेश कदम  विलास कणे, सतिश पवार, शिवाजी बोधले, भरत जाधव, श्रीरंग कावरे, संजय व्हटकर, सुधाकर पवार, जनाद॔न भोजने, शंकर व्हटकर, जगदीश कुलकर्णी, हणमंत भोजने, नरसिंग ताठे, महिला ठेवीदार  सलीमा शेख, कल्याणी जठार, संगीता नाईक, सुरय्या बागवान, वंदना गवते, दादाराव जाधव, अंकुश पवार, संजय आकुडे, अरूण तोडकरी, युसूफ पटेल, श्रीराम पवार, संतोष साळुंके, सोमनाथ घोगरे, विठ्ठल हुच्चे, अनिल जगताप, रूषिकेश भोसले यासह अनेकांचा सत्कार करण्यात आला. 

 
Top