तुळजापूर/ प्रतिनिधी- 

कृषी संजीवनी सप्तानिमित्त मौजे घाटंग्री येथे कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन उत्पादकता वाढ निवड झालेल्या लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवडीसाठी माहिती दिली व कागदपत्रे देण्यास सांगितले तसेच सोयाबीन बियाण्यास बीजप्रक्रिया करण्यासाठी माहिती दिली व बी बी ए पेरणी चे महत्व व फायदे सांगितले.

 यावेळी कृषी सहाय्यक श्री महेश सर्जे व संतोष माळी यांनी मार्गदर्शन केले यावेळी कृषी पर्यवेक्षक नितीन पाटील समुहसायक भक्ती भालेराव मॅडम तसेच गावातील शेतकरी व महिला  उपस्थित होते.


 
Top