उस्मानाबाद / प्रतिनिधी-

देशातील गोरगरीब, दीन - दुबळ्या, सर्वसामान्य लोकांना सन्मानाने जगता यावे, आत्मनिर्भर होता यावे, याकरिता आदरणीय मोदीजी अभिनव योजना राबवित असून त्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचण्यासाठी १० हजार जनकल्याण सेवक तयार करण्याचा संकल्प आमदार राणाजगजितसिंह पाटील   यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहामध्ये आयोजित गरीब कल्याण संमेलनाच्या ऑनलाईन प्रक्षेपणानंतर लाभार्थ्यांशी संवाद साधताना व्यक्त केला. यावेळी उपस्थित जेष्ठ स्वातंत्र सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

 सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मोदीजींच्या योजना प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवुन प्रत्येकाला लाभ मिळवून देण्यासाठी १० हजार जनकल्याण सेवक तयार करण्यात येणार आहेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहविण्यासाठी मदत करण्यात येणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब उपस्थित लाभार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले.

यावेळी जेष्ठ स्वातंत्र सैनिक श्री विष्णुपंत धाबेकर, बुबासाहेब जाधव, भास्कर नायगावकर, तेरणा कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शिंदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती प्रांजल शिंदे, तहसीलदार श्री गणेश माळी, गट विकास अधिकारी श्री शेरखाने, सहायक गट विकास अधिकारी श्री तायडे यांच्यासह बहुसंख्येने लाभार्थी उपस्थित होते. 

 
Top