उमरगा / प्रतिनिधी-

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त मंगळवारी (ता. ३१) येथिल जय मल्हार युवा सेना संघटनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. प्रारंभी महादेव गल्ली येथील समाजमंदिरात अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन सकल मराठा समाजाचे विनोद कोराळे यांच्या हस्ते करण्यात आले. 

राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या अहिल्यादेवी चौकात डॉ. विजय बेडदुर्गे यांच्या हस्ते पुतळ्याचे पुजन करण्यात आले. त्यानंतर दुचाकी फेरी काढण्यात आली, या दरम्यान श्री. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. शहरातील उपजिल्हा रुग्णालयात रूग्णांना फळ वाटप करण्यात आले.  दरम्यान एकुरगावाडी येथील तुळजाभवानी आश्रमशाळेतील मतिमंद, अपंग असलेल्या साठ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले व विद्यार्थ्यांना मिष्ठांन भोजन देण्यात आले. या वेळी प्रा. सचिन शिंदे, दत्तात्रेय शिंदे, माजी नगरसेवक महेश माशाळकर आदींची उपस्थिती होती.  संघटनेचे अध्यक्ष जालिंदर सोनटक्के, उपाध्यक्ष धनराज घोडके, सचिव अरूण गडदे, माजी नगरसेवक गोविंद घोडके, बालाजी घोडके, दिलीप घोडके, सुनिल सोनटक्के, संभाजी घोडके, रवी घोडके, सतीश घोडके आदींनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.

 
Top