उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद उस्मानाबाद यांच्या वतीने समर्पित (बाठीया) आयोगाच्या विरोधात तीव्र निदर्शने व जिल्हाधिकारी व नगर परिषद यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी अखिल भारतीय समता परिषद जिल्हाध्यक्ष महादेव माळी ,आबासाहेब खोत प्रदेश सचिव ,रॉबीन बगाडे तालुका अध्यक्ष, उस्मानाबाद ,शहानवाज सय्यद शहराध्यक्ष.. उस्मानाबाद,ओबीसी महासभा प्रदेश सचिव सचिन चौधरी, संतोष भाकरे प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, दत्तात्रेय पवार - तालुकाध्यक्ष ओबीसी सेल,लक्ष्मण राऊत ओबीसी तालुकाध्यक्ष , प्रकाश बालकुंदे उपाध्यक्ष ओबीसी, दिलीप राऊत तालुका संघटक इत्यादी उपस्थित होते.


 

 
Top