उस्मानाबाद / प्रतिनिधी -

अखिल भारतीय जिवा सेना जिल्हा उ.बाद आयोजित  नाभिक समाजातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या सोहळ्यात कुमारी.वैष्णवी बाळासाहेब शेटे,श्रीपतराव भोसले हायस्कूल उ.बाद,९९.००%,२) कुमारी.वैष्णवी शंकर जगदाळे जि.प.प्रा.व माध्यमिक शाळा सांजा, ८९.६०%,३) कुमारी .राजनंदिनी कैलास गोरे छत्रपती शिवाजी हायस्कूल उ.बाद,८५.६०%, ४) कुमार.दिपक किरण सुरवसे,सरस्वती हायस्कूल नारी,८४.%,५)कुमार.श्रीकृष्ण रमेश जगदाळे,श्रीपतराव भोसले हायस्कूल उ.बाद,७९.२०%, ६) कुमारी.सेजल बाबासाहेब गायकवाड,भाई उद्धवराव पाटील प्रशाला उ.बाद,७७.४०%, ७)कुमार.आलोक विकास जगदाळे,सरस्वती हायस्कूल उ.बाद,७०.६०% या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संघटनेच्या वतीने मान्यवराच्या हस्ते पुष्पहार,शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी  महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा उपाध्यक्ष जिवश्री जगन्नाथ आण्णा पवार,ज्येष्ठ कवी,अखिल भारतीय जिवा सेना जिल्हा कोषाध्यक्ष मधुकरराव हुजरे, प्रा.चांदपाशा शेख आम आदमी पार्टी जिल्हा मीडिया प्रमुख,नाभिक समाज ज्येष्ठ भगिनी सत्यभामा काशिनाथ गोरे,महाराष्ट्र नाभिक महामंडळ नवनिर्वाचित शहराध्यक्ष अक्षय माने,शहर विभाग प्रमुख रमेश जगदाळे अखिल भारतीय जिवा सेना उ.बाद ता.सचिव बाळासाहेब शेटे या मान्यवरांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.उत्तीर्ण विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त करत संघटनेचे आभार मानले.या कार्यक्रमासाठी नाभिक समाज बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव वाघमारे,प्रस्ताविक मराठवाडा संघटक सचिन मोरे,आभार जिल्हा प्रवक्ते तथा उ.बाद शहराध्यक्ष रवींद्र राऊत यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

 
Top