उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

शिवसेनेशी गद्दारी करून शिंदे गटात सहभागी झालेल्या तानाजी सावंत यांच्या उस्मानाबाद येथील संपर्क कार्यालयासमोर खेकडा सावंत गद्दार असे लिहीत शिवसैनिकांनी आक्रमक होत आंदोलन केले. यावेळी बंडखोर आमदार सावंत यांच्या संपर्क कार्यालयाचा बोर्ड शिवसैनिकांनी फाडून टाकला यावर बंडखोर आमदार सावंत यांनी जशाच तसे उत्तर दिले जाईल, असे सोशल मीडियाद्वारे उत्तर दिले आहे. 

शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा उपनेते आमदार डॉ तानाजीराव सावंत यांच्या उस्मानाबाद येथील संपर्क कार्यल्यासमोर शिवसैनिकांनी हल्लाबोल करीत आंदोलन केले. सावंत यांच्या कार्यालयाला फसले काळे, सावंत यांच्या विरोधात उस्मानाबाद जिल्ह्यात रोष वाढला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना न.प. गटनेते सोमनाथ गुरव यांनी यापुढे गद्दारांना माफी नाही, शिवसेनेने यांना मोठे केले आहे. तानाजी सावंत व ज्ञानराज चौगुले यांना जिल्हयात फिरू देणार नाही, असा इशारा ही यावेळी देण्यात आला. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मुंढे, युवा सेना सचिव अक्षय ढोबळे, माजी शहर प्रमुख प्रवीण कोकाटे, बाळासाहेब काकडे, रवी वाघमारे, बंडू आदरकर, सुरेश गवळी आदी शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते. 

 जशाच तसे उत्तर दिले जाईल -आ. डॉ.  सावंत 


आमचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आम्ही संयम बाळगून आहोत, एकदा हा राजकीय प्रश्न सुटला की येणाऱ्या काळात जसाच तसें उत्तर दिले जाईल. माझी नम्र विनंती आहे प्रत्येकाने आपल्या औकातीत राहावे असे आवाहन व इशारा सावंत यांनी दिला आहे.

डॉ सावंत यांचे उस्मानाबाद येथील कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्लाबोल करीत आंदोलन केले तर पुणे येथील कार्यालय संतप्त शिवसैनिकांनी फोडले. त्यानंतर सावंत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वरील प्रतिक्रिया दिली.

सूरज साळुंखे यांचा इशारा सावंत गटाचे कट्टर समर्थक माजी उपनगराध्यक्ष सुरज साळुंखे यांनी सावंत यांच्या संपर्क कार्यालयावर येऊन कांही जणांनी जे आंदोलन केले. त्या विरोधात त्यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला. आपल्याला एकाच शहरात राहायच आहे. सावंत आज ही शिवसेनेत आहेत. वरच्या पातळीवर चालले राजकारण ते पाहून घेतील, असे सांगून तुमच्या आंदोलनामागे येथे कौन आहे, मला माहित आहे,योग्य वेळी सांगण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

 
Top