उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील चिलवडी गावातील शेतकऱ्यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविदयालय आळणी (गडपाटी) उस्मानाबाद येथील कृषिदुतांनी प्रक्रिया व त्यांचे फायदे या विषयावर मार्गदर्शन केले.

 हे कृषिदुत कृषि पदवीच्या अंतिम वर्षात शिकत असून ग्रामीन जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषि औद्योगीक संलगन्ता उपक्रमाअतंर्गत दहा (१०) आठवडे चिलवडी या गावात कार्यरत राहणार आहेत. याप्रसंगी कृषिदुतांनी शेतकऱ्यांना खरीप सोयाबीन बीजप्रक्रिया कशी करावी व त्याचे फायदे हे सर्व प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी करून दाखवले व विदयार्थ्यांनी त्याची माहिती सांगितली. महाविद्यालयाच्या प्लांट पथोलॉजी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक बुरगुटे के. ए. यांचे मार्गदर्शन लाभले. 

या कार्यक्रमा प्रसंगी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. के. एच. पाटील, कार्यक्रम समन्वय डि. एस. शेटे, व दळवे एस. ए., याच बरोबर गावातील प्रगतशील शेतकरी यावेळी बाळासाहेब जाधव, पोपटराव जाधव, रविंद्र जाधव, प्रशांत जाधव, आबासाहेब माळी उपस्थीत होते. या कार्यक्रमाप्रसंगी कृषिदुत श्रीकांत शिंदे, निरज शिंगाडे , वैभव राठोड , शुभम वाघमारे, चिंतन पाटील,ऋषिकेश रणदिवे, आदित्य पाटील, कृषिकन्या अंकिता म्हेत्रे, स्वाती शिंदे या कृषीदुतानी व कृषीकन्यांनी विशेष मेहनत घेतली.


 
Top