उस्मानाबाद / प्रतिनिधी-

प्राथमीक आरोग्य केंद्र पोहनेर येथे महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअतंर्गत  सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे नुक्तेच आयोजन करण्यात आले. या शिबीरात 120 नागरिकांवर उपचार करण्यात आले.यावेळी  जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धनंजय पाटील आणि अति. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. तानाजी लाकाळ यांच्या मार्गदर्शनामध्ये डॉ गुरव, डॉ. आश्वीनी मुंडे, डॉ. दत्तात्रय भोसले, डॉ. रामढवे, डॉ. बागल, डॉ. वाघमारे आणि गावातील सरपंच श्रीमती. धावारे, उपसरपंच श्रीमती. शेख आणि माजी सरपंच विजयसिंह घोलकर यांच्या हस्ते करण्यात आले.

 महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत शिबीरामध्ये एकुण 120 नागरिकांची मोफत तपासणी करून उपचार करण्यात आला. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअतंर्गत  लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड (ई-कार्ड) बाबत मार्गदर्शन करण्यात आले, तसेच कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी जिल्हा रुग्णालय येथे येण्याचे आवाहन डॉ.पाटील यांनी केले. या शिबिरामध्ये बालरोग, शल्यचिकित्सा, भीषकतज्ञ सहभागी होऊन उपस्थितांची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच जिल्हा रुग्णांलयाचे ज्ञानोबा शेळके ,सत्यजित मुळे, नितीन ओमने, राम सोनटक्के,श्रीमती सस्ते व श्रीमती रणखांब ईत्यादी कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

 
Top