तुळजापूर (प्रतिनिधी)

तुळजापूर तालुक्यातील वडगाव देव येथे दि.७ मे रोजी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त खंडोबा मंदिर येथे बसव प्रतिष्ठान वडगाव देव यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये रक्तदानाकरिता सोलापूर येथील अक्षय ब्लड बँकचा कॅम्प उपस्थित होता.यामध्ये एकूण ४० जणांनी रक्तदान केले.यावेळी या रक्तदान शिबिराकरिता वडगाव देव येथील युवकांचा जास्तीत जास्त समावेश होता. यावेळी वडगाव देव येथील बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कोरे,उपाध्यक्ष.निळकंठ कोरे,बाबुराव कालेकर,अजय कोरे,सागर गोटे,निलेश गोटे, माधव पाटील,लक्ष्मण तोंडवळे, पवन पाटील,अविनाश सुपेकर,नितीन राजमाने,बंडू कोरे,लिंगाप्पा कोरे यांच्यासह पदाधिकारी व विविध पदांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top