उस्मानाबाद (प्रतिनिधी)

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे भव्य स्मारक उस्मानाबाद उभारून त्यासाठी निधी उपलब्ध करण्याची ग्वाही पालकमंंत्री शंकरावर गडाख यांनी दिली. राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मशताब्दी वर्ष स्मृतिदिनानिमित्त उस्मानाबाद येथील राजर्षी शाहू महाराज चौकात अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री गडाख बोलत होते. यावेळी आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता आदींची प्रमुख उपस्थिती होती. समितीचे अध्यक्ष बलराज रणदिवे यांनी सर्वांचे स्वागत केले. राजर्षी शाहू महाराज जनतेचे राजे होते त्यांचा सामाजिक, शैक्षणिक योगदानात मोठा वाटा होता असे प्रतिपादन आमदार कैलास पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजसिंहराजे निंबाळकर यांनी तर सूत्रसंचालन सचिव बालाजी तांबे यांनी केले. यावेळी अभिवादन सभेस शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रोहित पडवळ, शीलाताई उंबरे, मुकुंद सस्ते, शिवसेनेचे गटनेते सोमनाथ गुरव, अक्षय ढोबळे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार राजकुमार मेंढेकर यांनी मानले.

राजर्षी शाहू महाराज जनतेचे राजे होते त्यांचा सामाजिक, शैक्षणिक योगदानात मोठा वाटा होता असे प्रतिपादन आमदार कैलास पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजसिंहराजे निंबाळकर यांनी तर सूत्रसंचालन सचिव बालाजी तांबे यांनी केले. यावेळी अभिवादन सभेस शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रोहित पडवळ, शीलाताई उंबरे, मुकुंद सस्ते, शिवसेनेचे गटनेते सोमनाथ गुरव, अक्षय ढोबळे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार राजकुमार मेंढेकर यांनी मानले. 

 
Top