परंडा /प्रतिनिधी : - 

महाराष्ट्रातील वृध्द साहित्यिक, वृध्द कलावंत मानधन समितीच्या उस्मानाबाद जिल्हा कमिटी मध्ये परंडा तालुक्यातील भोंजा हवेली चे सुपुत्र ह भ प नागेश दत्तु मांजरे महाराज यांची परंडा तालुक्यातील वृध्द साहित्यिक वृध्द कलावंत यांच्या अडचणी दूर करण्यासाठी परंडा येथून बिनविरोध सदस्य पदी निवड झाल्याबद्दल भोंजा ग्रामस्थ व जगद्गुरू संत तुकाराम महाराज भजनी मंडळ यांच्या हस्ते सोमवार दि.९ रोजी मांजरे महाराज यांचा सन्मान करण्यात आला. 

    यावेळी वारकरी संप्रदाय परंडा उपाध्यक्ष परमेश्वर नेटके, मा सरपंच राम नेटके, मा सरपंच भिमराव मोरे, मा सरपंच नवनाथ मोरे, सदस्य रविंद्र मोरे, लघुउद्योग सल्लागार/डायरेक्टर गणेश नेटके, सचिन पाटील सर, बाबासाहेब घाडगे, विलास नेटके, अर्जुन मोरे, अंकुश भांदुर्गे, अंगद मांडरे, भिमराव नेटके, कोकाटे महाराज, जाधव महाराज, पांडुरंग मोरे, उत्रेश्वर मोरे, महादेव नेटके, लक्ष्मण कोळी, छगन मोरे, बाळासाहेब जाधव, उमराव नेटके, निखिल मोरे, बागायतदार अमोल मोरे आदि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top