उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 इंडीयन डेंटल असोसिएशनच्यावतीने (ता.सात)उस्मानाबाद येथे एक दिवसाच्या कार्यशाळा व दंतपरिषेदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महारष्ट्र राज्य दंत परिषदेचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

परिसंवादामध्ये दंतवैद्यक शास्त्रातील नवे प्रवाह, नवे तंत्रज्ञान, अभ्यासपत्रिका सादरीकरण, नवी उपकरणे व उत्पादने, नवी तंत्रे अशा विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली.नवी तंत्रे व उपयोजनांबाबत विचारविनिमय करताना डॉ.काळे यानी इथिक्स इन डेंटल प्रॅक्टीस या विषयावर मार्गदर्शन केले.डॉ.विष्वराज निकम यांनी अक्कल दाढ काढण्याच्या अत्याधुनिक तंत्राबद्दल मार्गदर्शन केले व प्रात्यक्षिक  दाखवले.डॉ.लक्ष्मण माळकुंजे यांनी बेसल इम्प्लॅंटोजी बद्दल मार्गदर्शन केले.या वेळी इंडीयन डेंटल असोसिएशनच्या उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष डॉ.जयेंद्र जहागिरदार, सचिव डॉ.आनंद स्वामी,डॉ.अजित बुरगुटे,डॉ.अभय मांगिरे,डॉ.अविनाश तांबारे,डॉ.संदेश गांधी,डॉ.विशाल सारडा तसेच जिल्यातील सर्व भागातून आलेल्या 40 दंतरोगतज्ञ यांची उपस्तिथी होती.

 
Top