तेर (प्रतिनिधी )

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील  गणपती चौकातील श्री गणेश मंदिरातील श्री गणेश मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा  भाविक भक्तांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत  संपन्न झाला 

तेर ता .उस्मानाबाद येथील गणपती चौकातील श्री गणेश मंदिराचा तेरसह परिसरातील भाविक भक्तांसह दानशूर मंडळी ,लेकमाता यांनी दिलेल्या देणगीतून मंदिराचे जिर्णोध्दार व शिखर उभारणीचे काम करण्यात आले .

शुक्रवार दि 6 मे रोजी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम कोकमठाण जि.अहमदनगर येथील संत बबन महाराज व अंबवडे जि.सातारा येथील जंगली महाराज आश्रमाचे संत ब्रम्हानंद महाराज यांच्या हस्ते भाविक भक्तांसह नागरिकांच्या उपस्थितीत  गणेशमूर्ती प्रतीष्ठापना व कलशारोहन सोहळा पार पडला 

यावेळी युवा नेते  मल्हार पाटील ,  जि.प.चे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव नाईकवाडी , सरपंच नवनाथ नाईकवाडी , उद्योजक सुजीत मुळे  , प्रभाकर घाटूळे , बंडू नाईकवाडी , नवनाथ भक्ते ,आदिंची प्रमुख उपस्थिती होती.   दुपारी ह.भ.प.भागवताचार्य पद्मनाभ महाराज व्यास यांचे काल्याचे कीर्तन सेवा संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी भाविक भक्तांसह ग्रामस्थ व लेकमाता मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सोहळा यशस्वी करण्यासाठी  संयोजक समिती आझाद गणेश मंडळ ,श्री रामायण सेवा मंडळ समस्त गावकरी मंडळ तेर यांनी परिश्रम घेतले  .


 
Top