उस्मानाबाद (प्रतिनिधी )

उस्मानाबादचे जेष्ट साहित्यिक यांच्या शेतातल्या माणसाच्या दुःखाची कहाणी सांगणाऱ्या “शेताच्या मरणाची गोष्ट “

या कथासंग्रहाला ज्ञानकिरण सामाजिक संस्था अणदूर यांचेकडून उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी दिला जाणारा”महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार .,2022 “ जाहीर झाला असून तो  दि.11/05/22 रोजी नळदूर्ग येथे  मा. आ. मधुकरराव चव्हाण यांचे शुभहस्ते तसेच मा जिल्हाधिकारी  कौस्तुभ दिवेगावकर, मा. संजय आवटे मुख्य संपादक  दिव्यमराठी ,मा .डॉ न सिमा पठाण सोलापूर यांचे उपस्थितीत प्रदान केला जाणार आहे.

 याच संग्रहाला कुंडल-कृष्णाई प्रतिष्ठाण कोरेगाव  (जि.सातारा) यांच्या वतीने “उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार “ जाहीर झाला आहे .याबद्दल मराठवाडा साहित्य परिषद उस्मानाबादचे अध्यक्ष मा नितीन तावडे, सिध्दी विनायक परिवारातर्फे दत्ताभाऊ कुलकर्णी, डॉ पद्मसिंह पतसंस्था उस्मानाबाद तर्फे  विक्रम  या पाटील यांनी विशेष सत्कार करुन अभिनंदन केले.  

 
Top