उस्मानाबाद (प्रतिनिधी)

तालुक्यातील व जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणाहून  विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांच्या संबंधित महाविद्यालयाच्या ठिकाणी  राज्य परिवहन महामंडळाच्या मासिक पास द्वारे प्रवास करतात. या विद्यार्थ्यांना दरवर्षी एप्रिल महिन्यापर्यंतच मासिक पास दिला जातो. परंतु कोरोणा मुळे  शैक्षणिक सत्र पुढे मागे झाल्यामुळे मे उजाडला असताना देखील उच्च माध्यमिक, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम अजूनही सुरू आहेत. अश्या वेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासासाठी सवलतीच्या दरात असणारे मासिक पास प्राप्त करण्यामध्ये अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यासंदर्भात राज्य परिवहन महामंडळाच्या धाराशिव विभाग नियंत्रक तामणकर यांच्याशी युवासेनेचे जिल्हा समन्वयक तथा दारफळचे सरपंच अॅड.संजय भोरे यांनी दूरध्वनी द्वारे संपर्क साधला असता त्यांनी महाविद्यालयीन प्राचार्यांकडून पत्राद्वारे किती कालावधी पर्यंत संबंधित महाविद्यालये सुरू असतील याबाबत पत्राद्वारे कळवण्या संदर्भात सांगितले आहे. जेणेकरून मुंबई कार्यालयाशी बोलून घेऊन मासिक पास सवलत सुरू ठेवता येईल असे तामणकर यांनी दूरध्वनीवर बोलताना अॅड.संजय भोरे यांना सांगितले आहे. तेंव्हा विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळणे हेतू धाराशिव शहरातील सर्वच महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी आगार व्यवस्थापकांना चालू शैक्षणिक सत्राच्या

कालावधी संदर्भात पत्राद्वारे कळवावे असे आवाहन युवासेनेचे जिल्हा समन्वयक तथा दारफळचे सरपंच अॅड.संजय भोरे यांनी केले आहे. तसेच इतर ज्या ज्या ठिकाणी अश्या अडचणी येत आहेत त्या त्या ठिकाणच्या सर्वच महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी संबंधित आगार व्यवस्थापकांना पत्राद्वारे कळवण्याची विनंती देखील त्यांनी केली आहे

 
Top