मुरुम / (प्रतिनिधी) : रिझर्व बँकेचे बदलते धोरण, ऑनलाइन बँकींग व्यवहार यामुळे बँकिंग क्षेत्रात खूप मोठा बदल झाला आहे. यामुळे पतसंस्थेला चांगले दिवस येऊन पतसंस्थेची चळवळ देखील राज्यात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. राज्यात पतसंस्थेची दिवसेंदिवस होणारी प्रगती, आधुनिक तंत्रज्ञानामुळे भावी काळात पतसंस्थानां खूप चांगले दिवस येतील असे मत फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी स्पष्ट केले. मुरुम येथील श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या बसव सहकार भवन ही संस्थेची नूतन इमारत व महात्मा बसवेश्वर ग्रंथालयाचा शुभारंभ गुरुवारी (ता.१२) रोजी करण्यात आला. जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाच्या   अध्यक्षस्थानी माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड होते. उद्घाटक महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादितचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे व महात्मा बसवेश्वर वाचनालयाचे उद्घाटक  उस्मानाबादचे    खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी  प्रमुख अतिथी म्हणून  आ. ज्ञानराज चौगुले, उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे,  मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबादचे उपाध्यक्ष प्रा. किरण सगर, प्रा. अनिता मुदकण्णा, सिद्रामप्पा चिंचोले, भीमराव वरनाळे, पतसंस्थेचे अध्यक्ष    शिवशंकर वरनाळे, उपाध्यक्ष शरणाप्पा मुदकण्णा, सचिव    कमलाकर जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना कोयटे म्हणाले की, या पतसंस्थेने सलग तीन वेळा दीपस्तंभ पुरस्कार घेऊन पतसंस्थेवर असलेला सभासदांचा विश्वास, पारदर्शक व्यवहार व कठोर वसुली यामुळे ही संस्था नावारूपाला येत आहे. अध्यक्षीय समारोपप्रसंगी रवींद्र गायकवाड म्हणाले की, ही पतसंस्था महाराष्ट्रात एक आदर्श संस्था म्हणून नावारूपाला आली पाहिजे. याकरिता आर्थिक व वैचारिक समृद्धी या दोन्हींच्या सांगड घालून ही संस्था काम करीत असल्याने या संस्थेची प्रगती दिवसेंदिवस होत असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रारंभी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून  दीपप्रज्वलन करीत अभिवादन करण्यात आले. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, जितेंद्र शिंदे, प्रा. अनिता मुदकण्णा, प्रा. किरण सगर आदींनी मनोगत व्यक्त केले. नागेश पाटील, मनीष मुदकण्णा, अमृत वरनाळे, अशोक जाधव, श्रीशैल बिराजदार, आनंदराव बिराजदार, श्रीशैल मायचारी, इंद्रजीत लोखंडे, रणधीर पवार, दत्तात्रय कांबळे आदिंनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवशरण वरनाळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संतोष पवार तर आभार मनोज बोंदर यांनी मानले. पतसंस्थेने पुस्तकरूपी भेट देण्याच्या संदर्भात केलेल्या आव्हानास परिसरातील अनेकांनी प्रतिसाद देऊन यावेळी ग्रंथरूपी भेट दिली. यावेळी परिसरातील विविध गावातील सभासद, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.             

 
Top