उस्मानाबाद /प्रतिनिधी -अवघ्या
महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या 2022 या वर्षीच्या व पुणे येथे गौरा फॅशन क्लब आयोजित आणि बोट क्लब येथे पारपडलेल्या "वीर महाराष्ट्राचा आणि वीरांगना महाराष्ट्राची" या सौंदर्य स्पर्धेत उस्मानाबादचे आरेफअली रफतअली कोतवाल हे या स्पर्धेत उपविजेते ठरले आहेत.

विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून 55 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. त्यातून उस्मानाबादचे आरेफअली रफतअली कोतवाल यांनी हा मान पटकाविला आहे.  त्यामळे सर्व महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असुन त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव संपुर्ण महाराष्ट्रात गाजवले आहे. आरेफअली हे श्री रफतअली कोतवाल , निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, उस्मानाबाद यांचे चिरंजीव आहेत.

 
Top