उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील कुलस्वामिनी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बील गेट्स जुनियर कॉलेजचा विनय कोळगे याचा डॉक्टर होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. त्याचा बीड येथील आदित्य आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश निश्चित झाल्यामुळे संस्था पदाधिकारी, प्राध्यापक, कर्मचार्‍यांसह विद्यार्थ्यांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

विनय कोळगे हा सामान्य कुटुंबातील विद्यार्थी असून बील गेट्स ज्युनिअर कॉलेजमध्ये तो शिक्षण घेत आहे. डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगून असलेल्या विनय याच्या जिद्दीला बील गेट्स ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांनी बळ देत त्याला योग्य मार्गदर्शन केले. अथक परिश्रम घेऊन केलेला अभ्यास आणि वेळोवेळी संस्थेकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे बीडच्या आदित्य आयुर्वेद महाविद्यालयात त्याला प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आणि डॉक्टर होण्याचे त्याचे स्वप्न लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. या यशाबद्दल संस्थेच्या वतीने त्याचा, त्याचे वडील विठ्ठल कोळगे  व आई बालिका कोळगे यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

या यशाबद्दल संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. रमेश दापके, डॉ. अर्शद रजवी,  प्रा. शिवसांब कुंभार, सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलचे प्रशासकीय अधिकारी सतीश जाधव, प्रा. वसंत पाटील, शशिकांत माने, सतीश सूर्यवंशी व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सोमनाथ लांडगे उपस्थित होते.

 -----------------

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम बील गेट्स कॉलेजच्या माध्यमातून केले जात आहे. ग्रामीण भागातून आलेल्या बील गेट्स ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी प्रवीण आणेराव हा  एमबीबीएस ला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई यापूर्वीच प्रवेश झाला आहे. त्या नंतर विनय कोळगे याचा बीएएमएस ला प्रवेश निश्चित झाला आहे. ही बाब काॅलेजसाठी अभिमानास्पद आहे. हे कष्टाने आणि जिद्दीने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. त्याचा आदर्श घेऊन इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रगती केली पाहिजे.

डॉ. दिग्गज दापके-देशमुख


 
Top