परंडा / प्रतिनिधी : - 

तालुक्यातील मौजे भोंजा हवेली येथे सिना - कोळेगाव प्रकल्प कंडारी शाखा कॅनल च्या अंतर्गत उन्हाळी आवर्तन देऊन शेतकऱ्यांना शनिवार दि.१४ रोजी पाणी सोडल्याने आनंदोत्सव व भोंजा येथील कॅनल च्या पाण्याचे पुजन विलास दशरथ नेटके लाभ धारक शेतकरी यांच्या हस्ते करण्यात आले. 

सिना - कोळेगाव प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या कंडारी कॅनॉलचे पाणी तालुक्यातील सोनारी, कंडारी, भोंजा ,कुभेंजा ,ईनगोदा, अनाळा, मुगांव येथील शेतकरी लाभार्थी यांना कडाक्याच्या उन्हात उन्हाळी हंगामातील पिकांना पाणी व पशु पक्षी , प्राणी, जनावरांना या पाण्याचा फायदा होणार आहे.

या प्रसंगी सिना - कोळेगाव प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता जोशी , JE राजगुरू ,JE पाटील, गवळी डी.व्ही,जोशी  यांनी प्रकल्पातून सोडलेल्या पाणी संदर्भात सविस्तर माहिती दिली.यावेळी डायरेक्टर लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके, देविदास सरवदे, अमोल नेटके, रोहित नेटके, सुजित नेटके आदि शेतकरी उपस्थित होते.

 
Top