तुळजापूर / प्रतिनिधी-

 तिर्थक्षेञ तुळजापूर नगरपरिषदेच्या प्रारूप प्रभागरचनेवर मुदतीत आठ  हरकती दाखल झाल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाने दिली आहे. सर्वच १ ते ११ प्रभागावर हरकती घेतल्या असुन  भाजपा- सेना- राष्ट्रवादी आदींनी हरकती घेतल्या आहेत. सर्वाधिक हरकती शिवसैनिकांनी घेतले. 

 १४ मे पर्यत ८ आक्षेप आले असुन  या आक्षेपावर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 23 मे पर्यत सुनावणी होणार आहे. ६ जुन ला विभागीय आयुक्त अंतीम प्रभाग रचना जाहीर करणार  असल्याची माहीती  नगरपरिषद सुञाने दिली. हरकती सुहास सांळुके,  सुधीर कदम, बाळासाहेब शिंदे, अविनाश रसाळ, शंकर शिंदे, शाम पवार, भरत जाधव, कालिदास नाईकवाडी, सागर इंगळे, दिनेश क्षिरसागर यांनी घेतल्या आहेत.

 
Top