तुळजापूर / प्रतिनिधी-

 तुळजापूर शहरासह परिसरास गुरुवार दि. १९ रोजी सांयकाळी मान्सुनपुर्व मुसळधार पावसाने झोडपुन काढले. हा पाऊस  सुमारे अर्धा तास बरसला.गेली दोन ते तीन दिवसापासुन ढगाळ वातावरण होते. वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. अखेर गुरुवार सांयकाळी सवापाच वाजता विजेच्या कडकडाट सह पावसास आरंभ झाला तो अर्धा तास मुक्त पणे बरसला. परंतू सदरील पाऊस हा शेतीसाठी लाभदायक नसल्याचे बळीराजाने सांगितले .

भाविक व्यापाऱ्यांचे हाल  गुरुवार सांयकाळी अचानक पाऊस आल्याने देविदर्शनार्थ आलेल्या भाविकांचे हाल झाले तसेच या झालेल्या मुसळधार पावसात व्यापारी वर्गाचा माल भिजुन नुकसान झाले.  या पावसामुळे भाविकांना भिजत देवीदर्शन घ्यावे लागले. या पावसामुळे सखल भागात पाणीच पाणी झाले होते.  

 
Top