तुळजापूर / प्रतिनिधी- 

येथील जवाहर नवोदय विद्यालयात विद्यालयातील परिचारिका अलका सूळ   यांचा गुरुवार दि.१९ रोजी सेवापुर्ती सोहळा निमित्ताने  त्यांचा सत्कार करुन निरोप देण्यात  आला. 

 अलका सुळ यांची  सेवा  सुरुवात जवाहर नवोदय विद्यालय जालना, नंदुरबार, सातारा येथे होऊन नवोदय विद्यालय तुळजापूर येथे समाप्त झाली.त्यांनी आपल्या सेवेची 33 वर्षे सेवा प्रामाणिकपणे  केली. या निमित्ताने नवोदय विद्यालय तुळजापूर परिवाराचे प्रमुख श्री. गंगारामसिंह  यांच्या हस्ते फेटा, शाल ,श्रीफळ ,सोन्याची रिंग, साडी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला .

यावेळी व्यासपीठावर  विद्यालयाचे उपप्राचार्य एस .व्ही. स्वामी, कार्यालयीन अधीक्षक एम. पी कुलकर्णी होते. तसेच या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते .याप्रसंगी वैष्णवी कुदळे ,संस्कार जोशी या विद्यार्थ्यांनी तर सुजाता कराड मॅडम ,श्री एच जी जाधव सर यांनी ही त्यांच्या  कार्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले .तसेच याप्रसंगी उपप्राचार्य  एस. व्ही. स्वामी यांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक करून विद्यार्थ्यांच्या आरोग्य विषयी तसेच नवोदय विद्यालय परिवारातील सदस्यांची कशी काळजी घेत होत्या या वरती आपले विचार प्रकट केले.  शेवटी विद्यालयाचे प्राचार्य. गंगाराम सिंह यांनी या एक परिचारिका नसून त्या एक नवोदय योद्धा कशा होत्या हे सांगितले. कारण  कोरोना काळात विद्यार्थ्यांची त्यांनी सेवा कशा पद्धतीने केली यावरती त्यांनी आपले विचार व्यक्त केले. शेवटी सत्कार मूर्ती अलका सूळ मॅडम आपले मनोगत व्यक्त करताना नवोदय परिवार तुळजापूर यांनी जे मला सहकार्य केले, प्रेम दिले ते मी आयुष्यभर कधीही विसरू शकणार नाही अशा प्रकारची भावना व्यक्त केली .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. जी.  भोरगे यांनी केले.

 
Top