परंडा/ प्रतिनिधी : -

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोहारा तालुका निरीक्षक पदी परंडा येथिल माजी नगरसेवक  राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाची प्रामाणिक व निष्ठा पुर्वक पक्ष संघटना सबंध जिल्हाभर बळकट करण्यासाठीं आज पर्यंत प्रयत्न केल्या मुळे पक्षश्रेठीनी ही संधी उपलब्ध करून दिली आहे.

बनसोडे यांची  नेमणूक झाल्याबद्दल जेष्ठ नेते जिवन रावजी गोरे ,माजी आमदार राहुल भैय्या मोटे, जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार,युवती काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष सक्षणाताई सलगर , जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर ,जिल्हा नेते प्रताप सिंह पाटील, जिल्हा सरचिटणीस नितिन बागल ,प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील साहेब ,महीला आघाडी मराठवाडा विभागीय अध्यक्ष सौ.वैशाली ताई मोटे, परांड्याचे नगराध्यक्ष  जाकीर भाई सौदागर, जि. प. गट नेते महेंद्र काका धुरगुडे साहेब,प्रदेश सरचिटणीस मसूद भाई शेख, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे मराठवाडा अध्यक्ष प्रा डॉ संजय  कांबळे , प्रदेश सरचिटणीस जालिंदर  कोकणे ,अशोक जाधव ,वक्ता सेल प्रदेश उपाध्यक्ष तुषार वाघमारे ,लोहरा तालुका अध्यक्ष सुनिल साळूंके , परांडा तालुका अध्यक्ष ॲड संदीप पाटील,परंडा शहर अध्यक्ष वाजिद दखनी यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

 
Top