उस्मानाबाद/प्रतिनिधी-

 कलाविष्कार अकादमी उस्मानाबाद यांच्या वतीने कै.श.मा.पाटील राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार पुणे येथील प्राचार्य डॉ अविनाश सांगोलेकर यांना जाहीर करण्यात आला होता. त्यासोबत कला, क्रीडा, साहित्य, संगीत व समाजकार्य या क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या संघटना/मंडळ ला कै. त्र्यंबक दादा शेळके राज्यस्तरीय सेवा पुरस्कार देऊन गौरविण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे सदरील पुरस्कार साठी उस्मानाबाद येथील कला, क्रिडा, साहित्य, नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वैचारिक पद्धतीने व वर्गणी मुक्त पद्धतीने साजरी करुन राज्यात एक आगळा वेगळा आदर्श निर्माण करणा-या  शिवराज्याभिषेक सोहळा समितीस जाहीर करण्यात आला आहे. या दोन्ही पुरस्कारांचे वितरण शनिवार दि.२८मे २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह जि.प. उस्मानाबाद येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होईल.व त्याच वेळी गझलश्रेष्ठ सुरेश भट यांच्या सोबत काम केलेले प्राचार्य डॉ अविनाश सांगोलेकर यांच्या अध्यक्षतेखाली गझलमुशायरा चे ही आयोजन करण्यात आले आहे. तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील रसिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन कलाविष्कार अकादमी तर्फे करण्यात आले आहे.


 
Top