उस्मानाबाद /प्रतिनिधी-

येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राला विद्यापीठाचा दर्जा देण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे प्रतिपादन शासन नियुक्त समितीचे अध्यक्ष प्रकाश बच्छाव यांनी केले.श्री बच्छाव उपकेंद्रात मंगळवारी दि.24 रोजी भेट िदली. यावेळी खा.ओमराजे निंबाळकर, सिनेट सदस्य संजय निंबाळकर, कॉग्रेसचे विश्वास शिंदे, भाजपचे अ‍ॅड.मिलींद पाटील, राष्ट्रवादी-काँग्रेसचे जीवनराव गोरे, भाजपचे राजसिंहराजे निंबाळकर, शिवसेनेचे अॅड.संजय भोरे यांचेसह जिल्ह्यातील शैक्षणीक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री बच्छाव म्हणाले की, राज्य शासनाला संतुलीत निर्णय घ्यावा लागतो, त्यासाठी लोकभावनेचा विचार करावा लागतो, अन्यथा राजकीय,सामाजिक, आर्थिक व शैक्षणीक क्षेत्रात तीव्र पडसाद उमटतात. त्यामुळे पडताळणीही आवश्यक असते. अशा पार्श्वभुमीवर उस्मानाबादेतील विद्यापीठ उपकेंद्राचे स्वतंत्र विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी अहवाल तयार करावा लागणार आहे. लोकभावनेचा आदर करत रत्नागीरीला स्वतंत्र विद्यापीठ देण्यात आले. एखाद्या संस्थेला, व्यवस्थेला आधार देण्यासाठी जे आर्थिक पाठबळ लागते ते मिळत नसेल तर ते हिंमतीने मिळवावे लागते. उस्मानाबादच्या विद्यापीठ उपकेंद्राला निधी उपलब्ध करून देण्यासाठी संजय निंबाळकर यांनी प्रयत्न करून छोट्या उपकेंद्राचे रूपांतर मोठ्या केंद्रात करून ठेवले आहे. त्यामुळे शासनाला सुध्दा स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीसाठी पोषक वातावरण तयार केले आहे, असा उल्लेख श्री बच्छाव यांनी केला.

राज्यातील शिक्षण हे मोठ्या प्रमाणात विद्यापीठातुन दिले जाते. त्यामुळे ही विद्यापीठे संशोधनाचे केंद्र बनले पाहिजे,असे श्री बच्छाव म्हणाले. उपकेंद्रात सध्या दहा शाखा अत्यंत चांगल्या पध्दतीने चालवील्या जातात. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे उपकेंद्रात कोविड लॅबची उभारणी हे एक महत्वाचा टप्पा आहे. जिल्हयाची लोकभावना पाहील्यास जिल्ह्यातील शैक्षणीक वातावरणामुळे शिक्षण संचालक ही दिले आहेत. शिक्षण संचालक श्री माने यांनी उस्मानाबादेत विद्यापीठ व्हावे यासाठी समितीवर नेमले.कामानिमित्त उस्मानाबादहुन-औरंगाबादला जाण्यासाठी कर्मचारी, विद्यार्थी व प्राध्यापकांना त्रास होतो त्याची जाणीव आहे. ही सर्व माहिती सकारात्मकपणे शासनापर्यंत पोहंचवीण्याचे काम करणार आहे, असे आश्वासन श्री बच्छाव यांनी दिले.

 
Top