उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सत्यमेव जयते..! अखेर शेतकऱ्यांना न्याय  शेवटी सत्याचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.  तर शिवसेंना आमदार कैलास पाटील यांनी केंद्र सरकारमुळेच विमा कंपनी राज्य सरकारचे ऐकत नव्हती, त्यामुळे शिवसेने न्यायालयात जाऊन हा न्याय मिळवला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एकंदर उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतरच उस्मानाबाद जिल्हयातील शेतकऱ्यांना विमा कंपनीनी नाकारलेला ५१० कोटीचा विमा मिळाल्याचे श्रेय घेण्यासाठी दोन्ही पक्षात चढाओड सुरू आहे. 

अामदार राणा पाटील ने म्हणाले की,  राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांनी न्यायालयात दाद मागितली, सातत्यपूर्ण व नियोजनबद्ध प्रयत्न केले. शेतकऱ्यांची न्याय्य मागणी ग्राह्य धरून ऐतिहासिक निर्णय देत शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर करून न्याय दिल्याबद्दल भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आभार व्यक्त केले आहेत. अॅड. वसंतराव साळुंखे व अॅड. राजदीप राऊत यांचीही कृतज्ञता आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली.

तर शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की,  केंद्र सरकारने कंपनीची बाजू घेतली . पीकविम्याचा परतावा केंद्र सरकारने कंपनीच्या सोयीचे निकष ठेवल्यानेच त्याचा आधार घेत विमा कंपनीने विमा देण्यास टाळाटाळ केली होती. हे निकष बदलण्याची विनंती राज्य सरकारने केंद्राकडे केल्यावरही केंद्राने ते बदलण्यास नकार दिला.केंद्राच्या जीवावरच कंपनी राज्य सरकारचे आदेश पाळत नव्हती. म्हणूनच सर्वात अगोदर शिवसेना न्यायालयात गेली, असा दावा आमदार कैलास पाटील यांनी केला आहे.


 
Top