तुळजापूर / प्रतिनिधी-

श्रीतुळजाभवानी पुजारी  मंडळाच्या  पदाधिकारी व श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्यात बैठक घेवुन मंदीरातील पुजारी वृंदाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खा. ओमराजे निंबाळकर यांनी शनिवार दि १४रोजी  तुळजाभवानी पुजारी मंडळ येथे  झालेल्या बैठकीत  केले.

या बैठकीला काँग्रेसचे जेष्ट नेते अशोक मगर, रा.काँ  गोकुळ शिंदे, सेनेचे सुधीर कदम, शाम पवार,  प्रतिक रोचकरी , सुनिल जाधव, किशोर गंगणे, विपीन शिंदे, भालचंद्र पाठक, नागेश सांळुके,  प्रा. धनंजय लोंढे ,  मकरंद प्रयाग, बबन गावडे,  तानाजी कदम  प्रमुख मंडळी उपस्थितीत होते.

या बैठकीत  धार्मिक विधी चालू करने, दर्शन पास बंद करणे,  देऊळ कवायत कलम ३६  छत्रपती संभाजीराजे देविदर्शन प्रकरणी सविस्तर चर्चा झाली.  यावर बोलताना खा. निंबाळकर म्हणाले की, प्रथम मी श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्याशी बोलतो त्यांचे मत  ऐकतो नंतर तिन्ही पुजारी मंडळांनी लेखी आपल्या मागण्या माझ्याकडेे द्या नंतर जिल्हाधिकारी व तिन्ही पुजारी मंडळ पदाधिकारी यांच्यात एक बैठक लावुन या बैठकीत आपल्या मागण्यांवर चर्चा करुनमार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे शेवटी म्हणाले .आजचा बैठकीला तिन्ही पुजारी मंडळाचे पुजारीसह काँग्रेस राष्ट्रवादी, काँग्रेस,  शिवसेना यांचे पदाधिकारी पुजारीवृंद हजर होते.


 
Top